हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कारेगाव शिवारात स्वतःच भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेट्स ठेऊन तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार (Hingoli News) रविवारी उडकीस आला आहे. वडिलांच्या नावे असलेले ७० हजाराचे कर्ज कसे फेडावे? या चिंतेमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. (Letest Marathi News)
नवल जयराम नायकवाल (२८) असे तरुणाचे नांव असून याप्रकरणी सेनगाव पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील जयराम नायकवाल यांचे कारेगाव शिवारात पाच एकर शेत आहे. या शेतात सोयाबीन व इतर पिके घेण्यात आली. मात्र अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तसेच सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे पेरणीसाठी घेतलेले ७० हजार रुपयांचे कर्ज फेडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
हमालीचे काम करून कर्ज फेडीचा प्रयत्न
दरम्यान, नवल नायकवाल याने गावात हमाली काम करून वडिलांचे कर्ज फेडण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र कर्ज फिटण्यास मोठा कालावधी लागेल; यामुळे नवल अस्वस्थ होता. शनिवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी तो हमालीचे काम करण्यासाठी जातो असे सांगून घरा बाहेर पडला. यावेळी त्याने स्वतःच्या स्टेटसवर नवल भावपूर्ण श्रध्दांजली असे नमुद केले तर साई मंदिराच्या मागे असेही स्टेटसवर नमुद केले आहे. मात्र या प्रकाराचा उलगडा त्यांच्या कुटुंबियांना झाला नाही.
दरम्यान, आज सकाळी नवल याचा मृतदेह साई मंदिराच्या मागे असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित भोईटे, जमादार अनिल भारती, चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी जयराम नायकवाल यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.