Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

गावाकडील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गच रोखला

गावाकडील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गच रोखला

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गावाकडील रस्ता दुरुस्ती होत नसल्याने शेकडो गावकऱ्यांनी या रस्त्याची दुरुस्तीची मागणी करत (Akola) अकोला– हैद्राबाद हा राष्‍ट्रीय महामार्ग रोखला आहे. नागरीकांच्‍या रास्‍ता रोको आंदोलनाने महामार्गावरील वाहतुक थप्‍प झाली आहे. (hingoli news villagers blocked the national highway to repair the road near the village)

१९९९ पासून कोंढुर, दिग्रस, वंजारवाडी, चिंचोर्डी पानदाडी राष्ट्रीय महामार्गापासून गावाकडे जाणारा रस्ता दुरुस्ती झाला (Hingoli News) नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावाकडील रस्‍ता दुरूस्‍तीची मागणी अनेकदा झाली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्‍त ग्रामस्‍थांनी थेट राष्‍ट्रीय महामार्गावर रास्‍ता रोको आंदोलन छेडले. बांधकाम विभागाचे अधिकारी जोपर्यंत आंदोलनस्थळी येणार नाहीत; तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. अखेर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत आठ दिवसात या रस्त्याच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

दोन्‍ही बाजूंनी पाच किमी रांगा

अकोला– हैद्राबाद हा १६१ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग कळमनुरी जवळील कोंढुरपाटी जवळ रोखत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. गावकऱ्यांच्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्था खोळंबली असून रस्त्याच्या दुतर्फा पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

SCROLL FOR NEXT