Ravikant Tupkar  Saam TV
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन रविकांत तुपकर आक्रमक; राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा

Ravikant Tupkar aggressive over farmers issue : हिंगोलीच्या गोरेगावमध्ये मागील सहा दिवसांपासून या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केल आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

Hingoli News :

आधी दुष्काळ आणि आता अवकाळी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात डोक्यावर कर्जाचं ओझं यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परिस्थिती अशी झाली आहे की बँकेकडून घेतलेले पीक कर्ज परतफेड करण्यासाठी अवयव विक्रीला काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

अवयव विक्रीला काढणाऱ्या शेतकऱ्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज भेट घेतली आहे. यावेळी नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंगोलीच्या गोरेगावमध्ये मागील सहा दिवसांपासून या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केल आहे.

सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने हे शेतकरी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पोहोचले.

दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतमालाला योग्य भाव मिळत नसेल तर आम्हालाही कडक भूमिका घ्यावी लागेल. मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना ज्या पद्धतीने गावबंदी करण्यात आली होती, त्याच पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील काळात असेच आंदोलन करेल, असा इशारा तुपकर यांनी सरकारला दिला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल तात्काळ सरकारने घेऊन कर्जमाफीची घोषणा अधिवेशनात करावी. असं देखील तुपकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

Black Raisin Benefits: हिवाळ्यात फक्त आठवडाभर खा भिजवलेले काळे मनुके, शरीरात दिसतील जबरदस्त बदल

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

SCROLL FOR NEXT