Hingoli Railway Bridge Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Railway Bridge : वर्षभरापूर्वी केलेला हिंगोलीतील रेल्वे उड्डाणपूल खचला; भीषण अपघाताची शक्यता

Hingoli News : हिंगोली शहरातून खटकाळीकडे जाणाऱ्या महामार्गावर हा महाकाय रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. सलग तीन वर्ष कालावधी या पुल निर्मितीच्या कामाला लागला होता.

संदीप नागरे

हिंगोली : रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून हिंगोलीत वर्षभरापूर्वी केंद्र शासनाच्या रेल्वे विभाग प्रशासनाकडून रेल्वे पूल उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र वर्षभरातच हा रेल्वे पूल अचानक खचला आहे. यामुळे येथे भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

हिंगोली (Hingoli) शहरातून खटकाळीकडे जाणाऱ्या महामार्गावर हा महाकाय रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. सलग तीन वर्ष कालावधी या पुल निर्मितीच्या कामाला लागला होता. त्यानंतर हा (Railway) रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र वर्षभरातच या पुलाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडून हा पूल खचला आहे. पुलावरून प्रवास करताना अनेक वेळा चार चाकी व दुचाकी चालकांचे अपघात होऊन मोठी दुखापत झाली आहे. 

दरम्यान हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे नागरिकांनी वारंवार या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची मागणी केली. मात्र खासदारांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुलावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलावर मोठे खड्डे पडल्याने त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दुरुस्ती न झाल्यास येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT