Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : कत्तलीसाठी बैलांना कोंबून नेणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त

Hingoli News : हिंगोली- वाशिम महामार्गावरील एका ट्रकमधून अवैधरित्या कत्तलीसाठी बैलाना नेले जात होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत महामार्गावर तपासणी सुरु केली.

संदीप नागरे

हिंगोली : मुक्या जनावरांची अवैधपणे होत असलेली वाहतूक अजूनही सुरूच आहे. अनेकदा असे प्रकार समोर (Hingoli) आल्यानंतर एकाच गाडीत कोंबून वाहतूक केली जात आहे. असाच प्रकार हिंगोलीमध्ये समोर आला असून (Police) पोलिसांनी कारवाई करत ट्रक जप्त केला आहे. (Live Marathi News)

हिंगोली- वाशिम महामार्गावरील एका ट्रकमधून अवैधरित्या कत्तलीसाठी बैलाना नेले जात होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत महामार्गावर तपासणी सुरु केली. या दरम्यान महामार्गावरील चिंचाळा पाटीजवळ बैलांना घेऊन जाणारा ट्रक थांबवत पोलिसांनी तपासणी केली. यानंतर (Hingoli Police) पोलिसांनी बैलांची सुटका करत ट्रक जप्त केला आहे.  सदरील कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेश दळवे यांच्या पथकाने केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपीस ट्रक चालक फरार 

पोलिसांनी कारवाई केली असताना घटनास्थळावरून ट्रक चालक व इतर आरोपींनी पळ काढत फरार झाले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकमधून एकूण ३३ बैल आणि वासरांची सुटका केली. ही जनावरे आता शासकीय गोशाळेत जमा करण्यात आली आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak: नॅशनल क्रश गिरिजा ओकबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

Kalyan News : नगर-पुण्यानंतर कल्याणमध्ये बिबट्याची दहशत, कुत्रे-जनावारांवर हल्ला, नागरिकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Live News Update : राष्ट्रीय पातळीवरील 38 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

SCROLL FOR NEXT