Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : धक्कादायक! अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या आई- वडील, भावाला संपवले; खुनानंतर अपघाताचा केला बनाव

Hingoli News : घरातील सर्वजण महेंद्र यास विरोध करत होते. तरी देखील तो ऐकत नव्हता. यातून आलेल्या रंगाच्या भरात महेंद्र याने आई- वडील व भावाचा खून केला

संदीप नागरे

हिंगोली : अनैतिक संबंधातून टोकाची भूमिका घेत पत्नी किंवा पतीला संपविल्याचये गुन्हे घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. (Hingoli) अशाच प्रकारचा गुन्हा हिंगोलीमध्ये घडला असून यात (Crime News) अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या वृद्ध आई- वडिलांसह सख्या भावाचाच खून केल्याची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेतील आरोपी असलेल्या महेंद्र जाधव याचे बाहेर अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती आई- वडिल व भावाला झाली होती. यामुळे घरातील सर्वजण महेंद्र यास विरोध करत होते. तरी देखील तो ऐकत नव्हता. यातून आलेल्या रंगाच्या भरात महेंद्र याने आई- वडील व भावाचा खून केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताचा केला बनाव 

तिघांच्याही खुनाची घटना लपवण्यासाठी आरोपीने दुचाकी (Accident) अपघातात या तिघांचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने हिंगोलीच्या बासंबा पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास केला. यामध्ये आरोपीने तिघांचाही कट रचून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महेंद्र जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT