Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : सुरळीत वीज पुरवठ्यासाठी शेतकरी रस्त्यावर; राज्य महामार्गावर दोन तास रास्ता रोको

HIngoli News : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने औंढा ते जिंतूर राज्य महामार्ग रोखत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे

संदीप नागरे

हिंगोली : शेतातील पिकांना पाण्याची गरज असताना महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीतपणे दिला जात नाही. यामुळे पीक करप्ट चालले आहेत. (Hingoli) हिंगोलीमध्ये हिच परिस्थिती असल्याने वीज वितरण विभागाच्या विरोधात आज शेतकरी (Farmer) रस्त्यावर उतरले. यावेळी राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन देखील केले. (Live Marathi News)

हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही. कोणत्याहीवेळी वीज खंडित होत असल्याच्या समस्येला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पिकांना वेळेत पाणी देता येत नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) शिवसेनेच्यावतीने औंढा ते जिंतूर राज्य महामार्ग रोखत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात औंढा तालुक्यातील बारा गावातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता, 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहतूक खोळंबली 

शेतकऱ्यांनी महामार्गावर दोन तास केलेल्या (Mahavitaran) आंदोलनामुळे राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT