Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News: दहा मिनिटाच्या वादळाने हाहाकार; झाडे गाड्यांवर पडली, रस्ते झाले जाम

दहा मिनिटाच्या वादळाने हाहाकार; झाडे गाड्यांवर पडली, रस्ते झाले जाम

साम टिव्ही ब्युरो

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली शहरामध्ये अचानक वादळी वारे येऊन मोठे नुकसान झाले आहे. मोठमोठी झाडे तुटून वाहनांवर (Hingoli) पडल्याने वीसपेक्षा जास्त चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर पन्नास व्यावसायिकांच्या दुकानावरील पत्रे उडाली आहेत. (Maharashtra News)

हवामान विभागाच्‍यावतीने वादळी वारा व पावसाची शक्‍यता वर्तविली होती. या अंदाजानुसार राज्‍यातील काही भागात पाऊस झाला. तर हिंगोली शहर परिसरात आज दुपारच्‍या सुमारास जोरदार वारे वाहू लागले. यामुळे हिंगोली शहरातील नांदेड नाका अग्रेसर चौक यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाडे कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था खोळंबली होती.

गाड्यांचे झाले नुकसान

अनेक ठिकाणी वाहने झाडांच्या खाली दाबली गेल्याने ही वाहने बाहेर काढणे कठीण बनले होते. या वादळी वाऱ्याने वीजवितरण विभागाचे पोल, तारा देखील तुटल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. आता हिंगोली पालिका व वीज वितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोलमडलेली व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT