Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : वाळू माफियांची मुजोरी उतरविली; डेप्युटी कलेक्टरकडून धिंड काढत शहरभर फिरवले

Hingoli News : वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर या वाळू माफियांनी हल्ला चढविला होता. मात्र काही तासातच उपजिल्हाधिकारींनी वाळू माफियांची दादागिरी आणि मस्ती काही वेळात उतरली होती.

संदीप नागरे

हिंगोली : वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. कारवाईसाठी गेलेल्या अधिकारी तसेच पथकावर हल्ले करत आपली मुजोरी वाढवत आहे. मात्र वाळू माफियांची हि मुजोरी हिंगोली मध्ये उतरविण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले. पथकावर हल्ला करणाऱ्याला पकडून  डेप्युटी कलेक्टर समाधान घुटुकडे यांनी शहरभर धिंड काढत फिरविले.

वाळू वाहतुकीला बंदी असताना देखील वाळूची नदीतून चोरटी वाहतूक केली जात असते. अर्थात वाळू माफिया प्रशासनाला न जुमानता सर्रासपणे वाळू वाहतूक करत असल्याचे पाहण्यास मिळते. अनेकदा वाळूची वाहतूक रोखण्यासाठी जाणाऱ्या पथकावर वाळू माफियांकडून हल्ला करण्यात येत असतात. असाच प्रकार हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात घडला असून पहाटेच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला होता. 

पहाटे केला हल्ला 

वाळू माफियांनी सेनगाव तालुक्यातील भानखेडा परिसरात आज पहाटे तीन वाजता महसूल प्रशासनाच्या तलाठ्यांना दमदाटी करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या वाळू माफियाना अटक केली होती. मात्र या वाळू माफियांचा हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी ताबा घेत शहरातून त्यांची धिंड काढली आहे. 

वाळू माफियांना शहरभर फिरविले 

हिंगोलीत महसूल प्रशासनाच्या पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांना हिंगोलीचे डेप्युटी कलेक्टर समाधान घुटुकडे यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसांनी वाळू माफियांना अटक केल्यानंतर महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपविभागीय दंडाधिकारी समाधान घुटुकडे यांनी हाताला हातकडी घातलेल्या अवस्थेत दोन वाळू माफियांची शहरातून धिंड काढली आहे. शहरातील इंदिरा चौक गांधी चौक जवाहर रोड अशा शहरातील प्रमुख भागातून वाळू मफियांना फिरवले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT