Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : हिंगोलीत तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

Hingoli News : तरुणाला कारागृहात पाठवले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून आत्महत्येपूर्वी या तरुणाने व्हाट्सअप मेसेजवर सुसाईड नोट लिहीत गळफास घेतला होता

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासनानंतर पोलीस उपनिरीक्षकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात प्रेम प्रकरणातून पोलिसांनी तरुणीच्या खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. यानंतर या तरुणाला कारागृहात पाठवले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून आत्महत्येपूर्वी या तरुणाने व्हाट्सअप मेसेजवर सुसाईड नोट लिहीत गळफास घेतला होता. यामध्ये पोलीस (Police) त्रास देत असल्याचे देखील तरुणाने म्हटलं होतं. यावरून पोलिसांनी अधिक तपास केला. 

९ जणांवर गुन्हा दाखल 

हिंगोलीच्या सेनगाव पोलीस स्थानकात संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे यांच्यासह नऊ जणांविरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस आणखी सखोल तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT