Hingoli Latest News Saam TV
महाराष्ट्र

Hingoli News: वय उलटूनही लग्न जमेना, नैराश्यातून तरुणाने संपवलं जीवन; हिंगोलीतील धक्कादायक घटना

Hingoli Latest News : नामदेव त्रिंबक जाधव (वय ३१) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. नामदेवने शेतशिवारात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.

Satish Daud

संदीप नागरे, साम टीव्ही हिंगोली

चांगलं शिक्षण होऊनही हाताला काम मिळालं नाही. त्यातच शेतीत कमी असल्याने कुणी मुलगी द्यायला तयार झालं नाही. यामुळे ३१ वर्षीय तरुणाला नैराश्य आलं. याच नैराश्यातून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना हिंगोलीतील जामठी खुर्द गावात शुक्रवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास घडली.

नामदेव त्रिंबक जाधव (वय ३१) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. नामदेवने शेतशिवारात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सध्या ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

प्रत्येक गावात सरासरी २० ते २५ तरुण लग्नासाठी आहे. मात्र, पुरेसं शिक्षण होऊनही नोकरी मिळत नसल्याने तसेच घरी कमी शेती असल्याने या तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणं कठीण झालंय. त्यामुळे अनेक तरुण नैराश्यात गेले आहेत.

हिंगोलीच्या जामठी गावातील नामदेव हा देखील लग्नासाठी मुलगी शोधत होता. मात्र, त्यालाही कुणी लग्नासाठी मुलगी दिली नाही. यामुळे नामदेव हा नैराश्यात गेला होता. आपलं लग्न होणार की नाही याची चिंता त्याला लागली होती. अखेर नामदेवने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास नामदेव हा शेतशिवारात गेला. तिथे त्याने एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. नामदेव यांच्या मृत्यूची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनं नामदेवच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT