Hingoli Earthquake News AI Image
महाराष्ट्र

Earthquake : सकाळीच हिंगोलीत प्रचंड खळबळ! भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली; रिश्टर स्केलवरील नोंद पाहून सगळेच हादरले

Maharashtra Hingoli Earthquake Update News : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात सकाळी ७.४६ वाजता ३.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

Alisha Khedekar

  • हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का

  • औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात सकाळी ७.४६ वाजता हादरा

  • भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली

हिंगोलीमधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात आज सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत माहिती दिली आहे. सकाळच्या वेळेत अचानक जाणवलेल्या या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कोणतीही मोठी हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात यापूर्वीही कळमनुरी, वसमत, हिंगोली आणि औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. यापूर्वी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू राहिला होता. त्यानंतर रामेश्वर आणि शिरळी गावांच्या शिवारात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.

भूकंपाच्या घटनांमध्ये केंद्रबिंदूच्या ठिकाणात बदल होत असल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. आज सकाळी गढाळा परिसरात जाणवलेला धक्का हा त्यातील आणखी एक धक्का असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच घरातील सुरक्षित ठिकाणी राहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भूकंपानंतर घरांच्या भिंती, इमारती किंवा इतर बांधकामांचे नुकसान झाले असल्यास नागरिकांनी त्या ठिकाणी जाणे टाळून संबंधित प्रशासनाला माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नसले तरी प्रशासनाकडून पुढील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :पुण्यात कोंढवा कौसरबागेतील रस्ता अतिक्रमणमुक्त

Wheat flour shelf life: गव्हाचं पीठ किती दिवसात खराब होतं?

Gorai Beach accident: गोराई बीचवर हिट अँड रनचा थरार; भरधाव गाडीची आधी रिक्षाला धडक, नंतर महिलांना उडवलं, 4 जणी गंभीर जखमी

Personal Loan EMI: पर्सनल लोन घेतलंय? व्याजाचा बोजा कमी करण्यासाठी हे 5 उपाय नक्की करा

Palghar Fort : निसर्गाच्या सान्निध्यात; १,०७० फूट उंच पालघरमधील 'हा' किल्ला तुमचं पुढचं ट्रेकिंग डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT