Crime News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News: धक्कादायक! लग्न करण्यास नकार दिल्याने वाद; तृतीयपंथीयाने तरुणाला संपवले

Crime News: या भयंकर हत्येने हिंगोलीमध्ये खळबळ उडाली असतानाच भंडाऱ्यामध्ये स्मशानभूमीत अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे..

संदीप नागरे

Hingoli News: लग्नास नकार दिल्याने तृतीयपंथीयाने तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोलीमध्ये ही भयंकर घटना घडली असून बातमीने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर संबंधित तृतीयपंथीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

काय आहे संपूर्ण प्रकरण...

याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील तृतीयपंथी आरोपी प्रिया नरसिंग तूरमळू उर्फ दीपक नरसिंग तुरमळू व मृत तरुण अशोक गजानन आठवले हे गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र राहत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे कारण म्हणजे अशोक आठवले या तरुणाने नरसिंगसोबत राहण्यास तसेच लग्न करण्यासही नकार दिला.

याच वादातून संतापाच्या भरात प्रिया उर्फ नरसिंगकडून अशोक आठवलेचा खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी खून करणारा तृतीयपंथी आरोपी प्रिया नरसिंग तूरमळू उर्फ दीपक नरसिंग तुरमळू याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (Hingoli Crime News)

स्मशानभूमीत आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह...

या भयंकर घटनेने लातूरमध्ये खळबळ माजली असतानाच भंडाऱ्यामध्ये (Bhandara News) स्मशानभूमीत अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. भंडारा येथून जवळच असलेल्या खरबी गावातील स्मशानभूमीतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांचा ताफा दाखल झाला असून ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. दरम्यान, संबंधित महिलेची ओळख अद्यापही पटली नसून ओळख पटू नये म्हणून महिलेचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT