Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : मुलीसोबत शाळेत गैरवर्तन करणं शिक्षकाला पडलं महागात; प्रशासनाने दाखवला थेट घरचा रस्तानिलंबन

Hingoli News : घटनेनंतर मुलीने घडला प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांनी हिंगोली शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली

संदीप नागरे

हिंगोली : बदलापूरमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना आता हिंगोलीमध्ये देखील एका शिक्षकाने शाळेत अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेनंतर पालकांनी हिंगोली शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली आहे. दरम्यान शाळा प्रशासनाने शिक्षकावर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. 

हिंगोली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या केदारनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारत प्राथमिक विद्यालयात हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर मुलीने घडला प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांनी हिंगोली शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. या नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या शाळेत जाऊन चौकशी केली आहे. मात्र शाळा प्रशासनाने शिक्षकाचे तातडीने निलंबन केले आहे. 

अद्याप गुन्हा दाखल नाही 

तर सदरच्या घटनेप्रकरणी पीडित मुलांच्या पालकांनी अद्याप पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली नसल्याने संबंधित शिक्षकाच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT