Hingoli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News : हिंगोलीत अल्पवयीन मुलीची छेड; दोन गटांत तुफान राडा, घरांवर दगडफेक

Crime News : दगडफेक झालेल्या परिसरात हिंगोली पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिला आहे.

Ruchika Jadhav

Hingoli News :

हिंगोली शहरात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही गट आमने-सामने आल्याने प्रचंड दगडफेक झालीये. काल रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मच्छी मार्केट आणि इंदिरा चौक परिसरात अनेक घरात दगडफेक सुरू होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हिंगोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

या संपूर्ण दगडफेकीच्या घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. परिसरातील अन्य नागरिकांनी देखील ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. पोलिसांनी हे व्हिडिओ पाहून पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

दरम्यान, हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चार ते पाच जणांविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा देखील समावेश आहे.

दगडफेक झालेल्या परिसरात हिंगोली पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिला आहे.

तरुणीसाठी पुण्यात भरदिवसा थरारक घटना

पुण्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. येथे एका मुलीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयाने दोन मित्र एकमेकांच्या जीवावर उठले होते. भररस्त्यात शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे यांनी एकमेकांवर कोयता तसेच अन्य धारदार शस्त्रांनी वार केलेत. या भांडणात दोघेही गंभीर जखमी झाले. पोलिसांनी वेळीच धाव घेत प्रकरण शांत केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे गटात अंतर्गत वाद उफाळला; 82 पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे, सामूहिक राजीनाम्यांनी राज्यात खळबळ

8th Pay Commission: ५२,६०० रुपये मूळ वेतन अन् ५ फिटमेंट फॅक्टर, ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Success Story: जिद्द! IAS होण्यासाठी परदेशातील नोकरी धुडकावली; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? इराणला मिटवण्याचा ट्रम्पचा निर्धार

SCROLL FOR NEXT