Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : सोन्याचे नकली बिस्कीट पुढे फेकत वृद्धेला लुटले; दिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

Hingoli News : झाडू विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यास हातभार लावत असते. दरम्यान दिवसभर झाडू विक्रीचा व्यवसाय करून सायंकाळच्या सुमारास घराकडे जात असताना तिघांनी संधी साधली

संदीप नागरे

हिंगोली : भर रस्त्यात लुटमारीची घटना वसमत शहरात घडली आहे. यात दिवसभर झाडू विक्री केल्यानंतर घरी परतणाऱ्या वृद्ध महिलेला सोन्याचे बिस्कीट पडल्याचे भासवून लुटण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी वसमत पोलिसात तक्रार दाखल करत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिंगोलीच्या वसमत शहरात चोरट्यांनी चतुरपणा दाखवत एका महिलेला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. द्रोपदाबाई कांबळे असे या महिलेचे नाव आहे. चोरट्यांकडून गाडी अडवून रस्त्यात गाठत लूटमार केल्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गाळातील सोन्याच्या चैन तोडून चोरटे पसार झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र रस्त्यात लूटमार करण्याचा नवीन प्रकार वसमत शहरात समोर आला आहे. 

महिला जात असलेल्या रस्त्यावर टाकले सोन्याचे बिस्कीट 

द्रौपदाबाई कांबळे हि महिला झाडू विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यास हातभार लावत असते. दरम्यान दिवसभर झाडू विक्रीचा व्यवसाय करून सायंकाळच्या सुमारास घराकडे जात असताना मोंढा परिसरात तीन चोरट्यांनी सोन्याचे नकली बिस्कीट महिला चालत असलेल्या रस्त्यावर पुढे फेकले. महिला येताच तुमचे सोन्याचे बिस्किट पडले आहे; अशी बतावणी केली. यामुळे महिला थांबली आणि पाहणी करू लागली. 

महिला थांबताच साधली संधी 

सोन्याचे बिस्कीट सांगितल्याने यामुळे महिला थांबली. यात महिलेला व्यस्त करत संधी साधत तिघांनी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून पळ काढला आहे. दरम्यान या प्रकरणी आता या महिलेच्या तक्रारीवरून वसमत पोलीस ठाण्यात तीन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र भररस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update:विलास घुले खून प्रकरणी आज न्यायिक मागणीसाठी केजमध्ये निघणार मोर्चा

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT