Hingoli Fire Saam TV
महाराष्ट्र

Hingoli Fire : होळीच्या दिवशीच अग्नितांडव!गोडाऊनला भीषण आग; लाखोंचं नुकसान

Hingoli Fire News : त्यामुळे आगीचे मोठे लोळ बाहेर दिसत होते. मात्र तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर परिसरातील कामगार व अग्निशमन पथकाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल आहे.

साम टिव्ही ब्युरो

Fire News :

हिंगोलीच्या वसमत शहरालगत असलेल्या हळदीच्या एका मोठ्या गोडाऊनमध्ये आग लागली आहे. आज सकाळी अचानक गोडाऊनमधून धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वसमत पालिकेच्या अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र गोडाऊनमधील प्लास्टिक पिशव्यांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आगीचे मोठे लोळ बाहेर दिसत होते. मात्र तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर परिसरातील कामगार व अग्निशमन पथकाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल आहे.

या घटनेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची खरेदी केलेली कोट्यवधी रुपयांची हळद जळून खाक झाली आहे. वसमत पोलिसात घटनेप्रकरणी नोंद करण्यात आली असून आगीचं कारण शोधण्यासाठी वसमत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ऐन होळीच्या दिवशी आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

अलीपूरमध्ये कारखान्याला भीषण आग

दिल्लीतील अलीपूर भागात देखील आगीची मोठी घटना समोर आली आहे. एका कारखान्याला सोमवारी आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण कारखान्याला विळखा घातला. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुळाचे लोळ उठलेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३४ बंब घटनास्थळी दाखल झालेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ

DIG च्या मुलीनं आयुष्याचा दोर कापला, AIIMS नागपूरमध्ये घेत होती शिक्षण

Shreya Ghoshal Concert: श्रेया घोषालच्या कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगरी; स्टेजजवळ हाणामारी, दोघे बेशुद्ध; पाहा VIDEO

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला, जालना हादरलं

SCROLL FOR NEXT