हिंगणघाट: हिंगणघाट जळीत कांड प्रकरणात न्यायालयात या प्रकरणात खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचे जाहीर करण्यात आले. अंकिता पिसुद्दे जळीत हत्याकांड प्रकरणी आज आरोपीला जन्मठेप होणार की त्याला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात येणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे (Hinganghat massacre case convict will be sentensed today Ankitas parents says we have faith in judiciary).
मात्र, या नराधमामुळे ज्यांच्या पोटचा गोळा त्यांच्यापासून नेहमीसाठी दुरावला आहे त्या अंकिताच्या आई-वडिलांची वेदना काय, त्यांची न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे, याबाबत त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.
विशेष म्हणजे आज अंकिताला जाऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आजच तिच्या हत्येच्या दोषीला शिक्षा (Sentence) सुनावली जाणार आहे. त्यामुळे अंकिताचे आई-वडील अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. अंकिताच्या द्वितिय पुण्यतिथीला तिला स्मरण करुन तिचे आई-वडील न्यायालयात (Hinganghat Court) दाखल झाले.
न्यायदेवता न्याय करतील, त्याला फाशी होईल - अंकितांच्या वडिलांना अपेक्षा
"आज माझ्या मुलीला जाऊन दोन वर्ष झाली आहेत. आज तिचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. आम्ही ते करुन कोर्टात आलो आहोत. काल त्या आरोपीवर दोषारोपण झालेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की न्यायदेवता न्याय करतील आणि त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा सुणावतील", असं तिचे वडील म्हणाले.
'मला तिची खूप आठवण येते', लेकीच्या आठवणीने माऊलीचा कंठ दाटला
"माझ्या मुलीला जाऊन दोन वर्ष झाली. मला तिची खूप आठवण येतेय. मला प्रत्येक क्षणी ती दिसते. जिथेही जाते तिथे माझी मुलगी दिसते. मला कुठे जावं वाटत नाही. आज निकाल आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. तिला आज नक्कीच न्याय मिळेल, अशी मला अपेक्षा आहे", अशी आशा अंकिताच्या आईने व्यक्त केली आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.