Jitendra Awhad Saam TV
महाराष्ट्र

Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Jitendra Awhad statement Over Shri Ram : जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेची आहे. जितेंद्र आव्हाड यांना प्रभू श्रीरामाबद्दल वक्तव्य करुन धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

प्रविण वाकचौरे

Jitendra Awhad News :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथे सुरु असलेल्या शिबिरात प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ : जितेंद्र आव्हाड यांनी काय सांगितले होते?

शिर्डीत तक्रार दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. याबाबत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हासहमंत्री सुरेंद्र महाले यांचा शिर्डी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.

ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेची आहे. जितेंद्र आव्हाड यांना प्रभू श्रीरामाबद्दल वक्तव्य करुन धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करावी असा अर्ज सुरेंद्र महाले यांनी दिला आहे. (Latest News)

नाशिकमध्ये साधू, महंत तक्रार दाखल करणार

नाशिकचे साधू, महंत आव्हाड यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे साधू, महंत आणि सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

पुण्यात भाजपचं आंदोलन

पुणे शहर भाजप जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता भाजपचे कार्यकर्ते अलका चित्रपटगृह चौक येथे एकत्र जमणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT