Nashik Crime Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik Crime: MBA केलेल्या महिलेचं धक्कादायक कृत्य, रूग्णालयातून ५ दिवसांच्या बाळाची चोरी; पोलिसांनी दिली धक्कादायक कबूली

Nashik Crime News: नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयातून ५ दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. या बाळाची चोरी उच्चशिक्षित महिलेनं केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत महिला आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयातून ५ दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. या बाळाची चोरी उच्चशिक्षित महिलेनं केल्याचं समोर आलंय. बाळाच्या वडीलांनी नवजात बाळाची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत महिला आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपी महिलेनं दोनदा गर्भपात झाल्यामुळे बाळाची चोरी केल्याचं सांगितलं. मात्र, आपली मुलगी खोटं बोलत असल्याचं सांगत, त्यांनी आरोपी महिलेचं बिंग फोडलं आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयात पाच दिवसांचे बाळ हरवल्याची तक्रार, बाळाचे वडील अब्दुल खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ विविध पथके रवाना केली. नाशिक गुन्हे शोध पथकाने अवघ्या बारा तासात बाळ शोधून आईकडे सोपवले.

बाळ चोरीला गेल्यानंतर नाशिक शहर पोलिसांचे विविध पथके आरोपी महिलेच्या मार्गावर होते. आरोपी महिला बाळाला घेऊन जात असताना सीसीटिव्हीत कैद झाली होती. शोधकार्य सुरू असताना, पंचवटी येथील एका खाजगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना तिच महिला आरोपी असल्याचं तपसात उघडकीस आलं. सपना मराठे असं आरोपी महिलेचं नाव असून, ही उच्चशिक्षित महिला धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे.

तिची अधिक चौकशी केली असता, दोनदा गर्भपात झाल्यानं आणि बाळ होत नसल्यामुळे चोरी केल्याचं आरोपी सपनाने कबूल केलं. गेल्या नऊ महिन्यांपासून महिलेने इतर नातेवाईकांना न भेटता प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं. नंतर बाळ चोरी करून ही महिला तिच्या घरी गेली. महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर, सपना मराठे ही खोटं बोलत असल्याचं समोर आलं. ज्यामुळे तिचं संपूर्ण बिंग फुटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT