Sangli News
Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

सांगलीत अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद

विजय पाटील

सांगली - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळा वरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरुद्ध भाजप (BJP) मध्ये उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने हाय अलर्टची भूमिका घेतली आहे. स्मारकाच्या ठिकाणी तगडा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात दाखल करण्यात आल्या आहेत. तर स्मारकाच्या भोवती उंच पत्रे उभारून बाजू झाकली आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच स्मारकाच्या सोहळ्या बाबत कुपवाडसह बामणोलीमध्ये बैठका घेणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

हे देखील पहा -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळा 2 एप्रिलला शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी आज 27 तारखेला मेंढपाळच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडेल अशी घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये जुंपली आहे.

दरम्यान, सुमारे 30 हजार चौरस फुटांच्या भूखंडावर महापालिकेने विजयनगर परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारले आहे. या स्मारकाचे काम 2010 पासून सुरू होते. आता या स्मारकाचे काम पूर्ण झाले असून यासाठी अडीच कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. या जागेवर अहिल्यादेवींचे स्मारक, वाचनालय, अतिथिगृह त्यासोबाबतच खुल्या जागेत बागही तयार करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: वृषभसह 4 राशींसाठी सोमवार ठरणार लकी, तुमची रास?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

SCROLL FOR NEXT