Rain Update
Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Rain : काेंडव्यात पावसाचं थैमान; 'या' तारखेपर्यंत सातारा जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा

ओंकार कदम

Satara Rain Update : सातारा शहरासह आजूबाजूच्या भागात अक्षरशः ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस (rain) झाला आहे. सातारा शहरा लगत असणाऱ्या कोंढवे परिसरातील ओढे नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने ओढ्यावरील पूल पाण्या खाली गेले आहेत. या भागातील काही घरांमध्ये देखील पावसाचे पाणी (water) शिरल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या शेतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

सातारा शहरात गेल्या दाेन तीन दिवसांपासून अधून मधून माेठ्या प्रमाणात पाऊस पडताे. त्यानंतर रस्ते , नाले पाण्यानं भरुन वाहतात. त्यामुळे सखल भागात वाहतुक काेंडी हाेत असते. गणेशाेत्सव काळात पाऊस पडत असल्याने सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हिरमाेड हाेत आहे. अनेक ठिकाणी जिवंत देखाव्यांना पावसाचा अडसर हाेत आहे.

दरम्यान हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सातारा जिल्ह्यात अकरा सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी गडगडाटासह पाऊस पडतेवेळी झाडाखाली थांबू नये. ओढे नाले नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. महत्त्वाचे काम नसल्यास अतिवृष्टी कालावधीत घराबाहेर पडण्याचे टाळावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

Gardening करण्याचे आरोगदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT