Chicken Thief Saam TV
महाराष्ट्र

कोंबडीचोराला चोरी पडली महागात; न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा

गोंदीया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका कोंबडीचोराला पोलिसांनी अटक केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोंदिया : गोंदीया जिल्ह्यामधील (Gondia District) अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कोंबडीचोराला पोलिसांनी अटक केली असून या कोंबडीचोराला न्यायालयाने १५ दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महागाव येथील सूर्यकांत पिल्लेवान यांच्या पोल्ट्री फार्ममधून १५ ते १६ मे या कालावधीत रात्रीच्या सुमारास १५ गावठी कोंबड्या चोरीला गेल्या होत्या. याबाबतची तक्रार त्यांनी अर्जुनी मोरगाव पोलिसांत केली होती.

दरम्यान, कोंबडीचोराला (Hens Thief) शोधण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी पथक तयार करून गुप्त माहिती काढली. या माहितीच्या आधारे संशयित आरोपी म्हणून पंकज काळसर्पे याला १७ मे रोजी ताब्यात घेतलं. त्याला विश्वासात घेऊन कोंबड्या चोरीबाबत विचारले असता, त्याने कोंबड्या चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. तसंच चोरी केलेल्या कोंबड्या अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon) येथील एका दुकानदारास पाच हजार रुपयांत विकल्याचंही कबूल केलं. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कमदेखील जप्त केली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक कदम यांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून १८ मे रोजी अर्जुनी मोरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केलं आहे. न्यायालयाने सर्व पुराव्यांची पडताळणी करून कोंबडीचोर पंकज काळसर्पे याला १५ दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच उल्लेखनीय म्हणजे, गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात अल्प कालावधीत न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची ही पहिलीच घटना आहे. तसंच या कोंबजीचोरास अटक करण्याची कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोरगावचे ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलिस अंमलदार दीपक खांडेकर, गाैरीशंकर कोरे प्रवीण बेहरे, लोकेश कोसरे, श्रीकांत मेश्राम, रमेश सेलोकर यांनी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT