हेलिकॉप्टरचा फॅन लागल्याने पायलटचा मृत्यू !  संजय राठोड
महाराष्ट्र

हेलिकॉप्टरचा फॅन लागल्याने पायलटचा मृत्यू !

एका युवकाने घरीच हेलिकॉप्टर बनवले. बनवलेल्या हेलिकॉप्टरचे रात्री दरम्यान ट्रायल घेण्यासाठी सुरू केलं असता फॅन तुटून पायलटच्या डोक्याला लागल्याने पायलटचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : फुलसांवगी येथील २५ वर्षाच्या एका युवकाने घरीच हेलिकॉप्टर बनवले. बनवलेल्या हेलिकॉप्टरचे Helicpoter रात्री दरम्यान ट्रायल घेण्यासाठी सुरू केलं असता फॅन तुटून पायलटच्या डोक्याला लागल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारा दरम्यान चालकचा मृत्यू झाल्याची माहिती महागाव पोलिसांनी दिली आहे.

तर मागील 2 वर्षा पासून इस्माईल ने हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता हळू हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते इस्माईल हा पत्रकारागिर होता.

हे देखील पहा-

इस्माईल हा पत्रकारागिर असल्याने तो अलमारी कुलर असे विविध उपकरणे बनवायचा. इस्माईल हा फक्त 8 वा वर्ग शिकलेला. पण एक दिवस त्याला काय माहीत कसे सुचले त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले. त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरु झाला. हळूहळू एक एक पार्ट तयार करू लागला आणि 2 वर्षाच्या प्रयत्नानंतर 15 ऑगस्टला त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते आणि 10 ऑगस्टच्या रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टर ची ट्रायल घेण्यास सुरुवात केली.

जमिनीवर इंजिन सुरू केले इंजिन 750 अम्पियर वर फिरत होते सर्व व्यवस्थित सुरू होते पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला. तो फॅन इस्माईल च्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईलचा मृत्यू झाला.

त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो त्याच्या आणि त्याच्या गावाला जगा पर्यंत नाव करयचे पण इस्माईल चे स्वप्न अर्धवटच राहिले आणि फुलसावंगीच्या रँचोचा ट्रायल दरम्यान मृत्यू झाला. १५ ऑगस्ट ला हेलिकॉप्टर लाँच करणार होता अशी माहिती आहे.

हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या इस्माईल शेख रात्री दरम्यान ट्रायल घेण्यासाठी हेलिकॉप्टर सुरू केलं मात्र फॅन तुटून डोक्याला लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT