Monsoon : पुढील चार दिवसात या राज्यांत मुसळधार पाऊस Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon : पुढील चार दिवसात या राज्यांत मुसळधार पाऊस

अनेक भागात तीव्र पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अनेक भागात तीव्र पावसाची शक्यता Heavy Rain वर्तवली जात आहे. काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे, ज्या भागात पाणी साचण्याची परिस्थिती आहे. त्या ठिकाणच्या लोकांना घराबाहेर पडताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हवामान विभागाने Meteorological Department सांगितलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र Maharashtra, कोकण आणि गोवा Konkan & Goa, मध्य प्रदेश Madhya Pradesh, विदर्भ, गुजरात Gujarat, पूर्व राजस्थान Rajasthan, छत्तीसगड Chhattisgarh आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे देखील पहा-

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी आणि मंगळवारी ओडिशा, गुजरात आणि मध्य महाराष्ट्र व कोकण वगळता गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत देशभरात मुसळधार पाऊस दिसू शकणार आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवसांमध्ये किनारपट्टी कर्नाटकच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

13 तारखेला किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत तर केरळमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाच्या मते, दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे, डोंगराळ राज्य उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातचा पूर्व भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर पाऊस असणार आहे.

तर फक्त महाराष्ष्ट्र राज्याचा विचार करता हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर अतिवेगाने वारे वाहणार आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा, अंदाज आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. पुढील 24 तासात ते आणखी मोठ्या तीव्र स्वरूपात होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता IMD ने वर्तवली आहे.

त्याचबरोबर हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT