Rain Update Saam tv
महाराष्ट्र

Rain Update : नाशिक, डोंबिवलीत जोरदार पाऊस; रत्नागिरीत येलो अलर्ट

Nashik Ratnagiri News : राज्यात मान्सून दाखल झाला असून रोज कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडत आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे.

Rajesh Sonwane

कल्याण/ नाशिक/ रत्नागिरी : राज्यात मान्सून दाखल झाला असून रोज कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडत आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान आज रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर डोंबिवलीत दोन दिवसांनंतर पुन्हा पावसाळा सुरवात झाली असून नाशिकमध्ये देखील दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाळा सुरवात झाली. 

रत्नागिरी : हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत पावसाची जोरदार बँटींग सुरु आहे. रत्नागिरीसोबतच लांजा, राजापूर, संगमेश्वरसह जिल्ह्यातील इतर भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.  गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २९.१५ मि.मी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे राजापूर आठवडी बाजारात आलेल्या नागरीकांची तारांबळ उडाली असून दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. 

नाशिकमध्ये जोरदार पाऊस 

नाशिक : हवामान खात्याने नाशिकला ऑरेंज अलर्ट (Rain Alert) दिला होता. त्यानुसार नाशिकमध्ये देखील दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसापासून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. या पावसामुळे पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे. तर पावसाच्या हजेरीने नाशिककर सुखावले असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

दोन दिवसानंतर कल्याण- डोंबिवलीत पावसाला सुरुवात

कल्याण : दोन दिवसानंतर कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचा पाहायला मिळाला. गेला अर्ध्या तासापासून कल्याण डोंबिवलीत पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे महापालिका मुख्यालयालगत लाक्षणिक उपोषणासाठी बसलेल्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अर्ध्या तासापासून पाऊस कोसळत असल्याने कल्याण डोंबिवलीत गारवा निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

SCROLL FOR NEXT