Buldhana Rain Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Rain Update : बुलढाण्यात 3 तालुक्यात अतिवृष्टी, एक लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान

Rain Update News : संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात अचानक ढगफुटी सदृश पाऊस बरसला.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे एक लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परिसरात आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी अद्यापही अतिवृष्टीचे दहशत या भागातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आहे.

काल सकाळी संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात अचानक ढगफुटी सदृश पाऊस बरसला. बावणबीर गावातील केदार नदीला महापूर आला होता. यामुळे मात्र अनेक शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. परिसरातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिके एक तर पाण्याखाली आहेत किंवा जमीन खरडून गेली आहे आणि यामुळे मात्र शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभे राहिलेला आहे.

संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक हेक्टर वरील पिके सध्या पाण्याखाली आहेत. तर संग्रामपूर शहरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. थोडक्यात म्हणजे संग्रामपूर जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात हे नुकसानीचे दृश्य दिसत आहे. गावात असो किंवा शेतात सगळीकडे काही ना काही प्रमाणात प्रत्येक नागरिकांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे. (Breaking Marathi News)

अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त संग्रामपूर तालुक्याला बसला असून या तालुक्यात जवळपास 40 हजार हेक्‍टरवरील पिकाचं नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने या तिन्ही तालुक्यात पंचनामे सुरू केले असून खासदार प्रतापराव जाधव यांनी या परिसराचा आज दौरा केला व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत केल्या जाईल असे आश्वासनही त्यांनी दिलं.  (heavy Rain)

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाला आहे. तर हजारो घरांची पडझड झालेली आहे. मात्र राज्य शासनाचा एकही प्रतिनिधी या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर 24 तासातही पोहोचला नव्हता त्यामुळे नागरिकात रोष आहे. (Tajya Marathi Batmya)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

Maharashtra Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावर दोन बाईक अपघातात कल्याण डोंबिवली येथील नवरा बायकोचा जागीच मृत्यू

Kitchen Hacks : भांडी धुतल्यानंतर ही भांड्यांना दुर्गंधी येते? मग हि सोपी ट्रिक करा फोलो

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT