Maharashtra Monsoon Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : कोकण, घाटमाथ्यासह 'या' ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

Maharashtra News : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर विदर्भ व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

Alisha Khedekar

  • कोकण व घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा अंदाज

  • विदर्भ व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता, येलो अलर्ट जारी

  • उर्वरित राज्यात पावसाची उघडीप व उकाड्याचा त्रास कायम

  • वर्धा येथे ३२.८ अंश उच्चांकी तापमान नोंदले

राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज कोकण,घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळत आहेत. काही भागात पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. महिन्याच्या अखेरीस सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान असल्याने उकाडा चांगलाच वाढल्याचे चित्र होते.

सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह, हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

पुढील काही दिवस हवामानात अशीच चढ-उताराची स्थिती राहण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान गणपती विसर्जनाला पावसाचे सावट असेच कायम राहणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT