येत्या २४ तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हाय अलर्ट जारी Saam Tv News
महाराष्ट्र

येत्या २४ तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हाय अलर्ट जारी

राज्यात येत्या २४ तासांत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. १४ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर येत्या २४ तासांत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy rain to fall in next 24 hours; high Alert issued)

हे देखील पहा -

हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा या चौदा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

राज्यात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक भागात पुर आल्याने जीवीतहानी आणि वित्तहानी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा या चौदा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT