राज्यात उद्यापासून सलग तीन दिवस पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून सलग तीन दिवस पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात उद्यापासून ३ दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने हा अंदाज वर्तविला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात Maharashtra उद्यापासून ३ दिवस जोरदार पाऊस Heavy Rainfall होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने Weather forecast हा अंदाज वर्तविला आहे. उद्यापासून म्हणजे 4 ते 6 सप्टेंबर या दरम्यान राज्यात पाऊस परत एकदा जोर धरणार आहे. आज बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

तर उद्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. येणाऱ्या ५ सप्टेंबरसाठी हवामान खात्याने पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्याकरिता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ६ सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसहीत मराठवाडा आणि विदर्भ मधील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

यामुळे याकरिता देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ३-४ दिवसांत राज्यात मान्सून दिमाखात आगमन करणार आहे, अशी शक्यता वर्तवली गेली आहे. पुढील ४ ते ५ दिवसामध्ये बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे.

यामुळे राज्यात परत मान्सून सक्रिय होणार, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच भारी फायदा होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

JioPC: टीव्हीला संगणक बनवा JioPC च्या किफायतशीर प्लॅनसह, फक्त ५९९ रुपयांत

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाला लाडकीला ओवाळणी मिळणार! २९८४ कोटींचा निधी वर्ग, खात्यात ₹३००० खटाखट येणार?

अर्धा लिंबू, कुंकू अन् टाचण्या.. अजित पवार गटातील नेत्याच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

Maharashtra Monsoon Update : मुंबईत पावसाची दांडी, विदर्भात आज विजांच्या कडकटासह तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कणकवली रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT