Nashik rain news  saam tv
महाराष्ट्र

Video| नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस; नदीच्या काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक (Nashik) जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ९ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Heavy Rain News : नाशिक (Nashik) जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ९ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. तर ८ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील १६ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदीच्या काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणात नव्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यातील ९ धरणे पूर्ण क्षमतेने भरली, तर ८ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १६ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दारणा धरणातून ५ हजार ७०८, नांदूरमध्यमेश्वरमधून १४ हजार ४२० क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे . गंगापूर धरणातून १५०० क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य धरणांमधूनही कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २४ लहान, मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सध्या ९० टक्के पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, नाशिकच्या त्रंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून ४ हजार क्युसेक वेगानं पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT