विसरवाडीमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी एकाचा पाय फ्रॅक्चर, दोघांना अटक! दिनू गावित
महाराष्ट्र

विसरवाडीमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी एकाचा पाय फ्रॅक्चर, दोघांना अटक!

दहा ते बारा व्यक्तींच्या गटांकडून तीन जणांना बेदम मारहाण झाली.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील विसरवाडी (Visarwadi) येथे भर बाजारात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी (Fighting) झाली आहे. दहा ते बारा व्यक्तींच्या गटांकडून तीन जणांना बेदम मारहाण झाली असून यात राजेश गावित या तरुणाचा पाय फ्रॅक्चर (Foot fracture) झाला आहे. राजेश वरती धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. (Heavy fighting in two group fractured one leg)

हे देखील पहा -

त्याच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचार नंदुरबार ग्रामीण रुग्णालया मध्ये सुरू आहेत. भरदिवसा बाजारपेठेत दोन गटांमध्ये झालेल्या या हाणामारी मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी (Subdivisional Police Officer) सचिन हिरे हे पथकासह दाखल झाल्याने घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे यात आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन अहिरे यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma : फायर हूँ मैं....पाकिस्तानला नडणारा अभिषेक शर्मा टी २० मध्ये @1

Jio vs Airtel: दररोज १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगसह स्वस्त प्लॅन कोणाकडे आहे?

Jalgaon Heavy Rain : हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना

Ahilyanagar Rain : अहिल्यानगरमध्ये रस्ते वाहून गेले, पण दूध उत्पादकाने दोरीच्या साह्याने पोहोचवले दुधाचे कॅन | VIDEO

Metro : आता मेट्रोत रिल्स, व्हिडिओ कराल तर कारवाई होणार, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT