Crime Saam tv
महाराष्ट्र

Crime: 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न, तरूणीनं सपवलं आयुष्य

Ahilyanagar Police Register Case Against Family: मुलाकडच्या मंडळींनी लग्न मोडल्यामुळे तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे.

Bhagyashree Kamble

मुलाकडच्या मंडळींनी लग्न मोडल्यामुळे तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील जामखेड पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. तरूणाच्या कुटुंबाने आणि तरूणाने 'आपली जोडी शोभत नाही' या कारणास्तव लग्न मोडले. लग्न मोडल्याने तरूणीला मानसिक तणाव आला. याच तणावाखाली तरूणीने टोकाचे पाऊल उचलले. तिने गळफास घेत आयुष्य संपवले. या प्रकरणी मुलासह आई- वडिलांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

मोनिका सुरवसे हिचं लग्न महेश मेंगडे याच्याशी जमलं होतं. मात्र, लग्न जमल्यानंतर, 'तू मला आवडली नाही. मला तू शोभत नाही', असे म्हणत महेशने मोनिकाचा अपमान केला आणि लग्न मोडले. तसेच तरूणाची आई अनुजा दत्तात्रय मेंगडे आणि वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे यांनी तरूणीचा अपमान केला होता. 'तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभून दिसत नाही', असं म्हणत त्यांनी तरूणीचा अपमान केला.

मुलीने उचलले टोकाचे पाऊल

लग्न मोडल्यानंतर तरूणीने मानसिक त्रास झाला.याच त्रासामुळे तरूणीने डिसलेवाडी येथील राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. तिने घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलीने गळफास घेतल्यानंतर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी तरूणासह त्याच्या आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनवलकर करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT