Health Department Recruitment Saam tv
महाराष्ट्र

Health Department Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात बंपर भरती, ११ हजार रिक्त पदं भरली जाणार

Maharashtra Health Minister Tanaji Sawant: राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

Rashmi Puranik

Maharashtra Government: नोकरीच्या शोधामध्ये (Job Search) असणाऱ्या आणि आरोग्य विभागात नोकरीसाठी (Health Department Job) प्रयत्न करत असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये लवकरच आरोग्य विभागामध्ये मेगा भरती होणार आहे. तब्बल ११ हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Maharashtra Health Minister Tanaji Sawant) यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती या प्रक्रियेअंतर्गत केली जाणार आहे.

तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा प्रकार झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागात नोकरीच्या शोधात असलेल्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

आता होणाऱ्या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाणार आहे, अशी देखील माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT