राजेश टोपेंच्या परीक्षार्थींना शुभेच्छा, मात्र गोंधळ काय संपेना; पाहा Video Saam Tv
महाराष्ट्र

राजेश टोपेंच्या परीक्षार्थींना शुभेच्छा, मात्र गोंधळ काय संपेना; पाहा Video

आज आरोग्य विभागाच्या क गटासाठी परीक्षा पार पडत आहेत. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थींना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिजीत सोनावणे, लक्ष्मण सोळुंके, सागर आव्हाड,सामटीव्ही, पुणे

मुंबई: आज आरोग्य विभागाच्या क गटासाठी परीक्षा पार पडत आहेत. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थींना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. न्यासा संस्थेशी योग्य समन्वय साधून परीक्षा चांगल्या पार पडाव्या याबाबत योग्य नियोजन केल्याचं देखील टोपे यांनी म्हटलं आहे. 31 तारखेला पार पडणाऱ्या परीक्षेसाठी देखील टोपे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण आरोग्य विभाग भरती परीक्षेत पुन्हा गोंधळ झालेला पाहायसा मिळाला आहे. ऐन परीक्षेच्या दिवशीच पुन्हा गोंधळ झालेला आहे.

नाशिकच्या गिरणारेमधील के.बी.एच. विद्यालयातील परीक्षा केंद्रावर गोंधळ झालेलं पाहायला मिळालं. परीक्षार्थी जास्त तर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका कमी आल्यानं पेपरला सुरुवात झालेली नव्हती. परिक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ घातला. राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. इतर ठिकाणी पेपर सुरू झाला मात्र के.बी.एच. विद्यालयात पेपर अद्याप सुरू झाला नव्हता. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं आहे.

इकडे पुण्यामधील आबेदा इनामदार कॉलेजमध्ये पुणे येथील परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळचे १०:०२ वाजूनही विद्यार्थ्याना पेपर मिळालेला नव्हता आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे परीक्षार्थींनी गोंधळ घातला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Maharashtra Live News Update : यंदाच्या हंगामात पांझरा नदी पहिल्यांदाच वाहू लागली दुथडी भरून

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? आत्ताच हा यशाचा मंत्र लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT