बीड पोलिसांकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 51 लाखांची रोकड जप्त SaamTvNews
महाराष्ट्र

बीड पोलिसांकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 51 लाखांची रोकड जप्त

आयकर चुकवून पैशांचा बेकायदा व्यवहार करणारे हे हवाला रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. आयकर चुकवून पैशांचा बेकायदा व्यवहार करणारे हे हवाला रॅकेट (Hawala Racket) पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने, बीड (Beed) शहरात 3 ठिकाणी छापेमारी करत 51 लाखांची रक्कम जप्त केलीय. तर हे रॅकेट चालवणाऱ्या 3 फर्मच्या 3 व्यवस्थापकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

हे देखील पहा :

आयकर चुकवून टोकन पैशांची फिरवाफिरवी करणारे काही जण बीडमध्ये हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती, पंकज कुमावत यांना मिळाली होती. काल उशिरा पोलिसांनी छापमारी करत ही कारवाई केलीय. पोलिस पथकाने शहरातील कबाड गल्लीतील न्यू इंडिया अंगडिया येथे कारवाई करत, 35 लाख 79 हजार रुपये, जालना रोडवरील आर.क्रांती ट्रेडर्स येथे 9 लाख रुपये तर सिध्दीविनायक व्यापारी संकुलासमोरील येथे 6 लाख 41 हजार रुपये, अशी एकूण 51 लाख 26 हजार रुपयांची बेकायदा रोकड आढळून आलीय.

दरम्यान, यावेळी पोलिसांनी मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे या 3 व्यवस्थापकांना ताब्यात घेतले आहे. असून बीड शहर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आणखी हवाला रॅकेटचे मोहरे पोलिसांच्या ताब्यात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT