Harshvardhan Sapkal attack on Devendra Fadnavis  Saam TV News
महाराष्ट्र

Eknath Shinde : शिंदेंचा सपकाळांवर घणाघात, देवेंद्रसाठी एकनाथ धावले; औरंगजेबाशी तुलना केल्याने संताप

Eknath Shinde on Devendra Fadnavis : अधिवेशनात एकनाथ शिंदे संतापलेले दिसले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची तुलना थेट औरंगजेबाशी केली होती. त्यावरुन शिंदेंचा संताप दिसून आला.

Prashant Patil

गिरीश निकम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये कुरघोडींचं राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र आज अधिवेशनात फडणवीसांसाठी एकनाथ शिंदे धावून आले. काँग्रेसच्या टीकेला शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाहूया एक रिपोर्ट.

अधिवेशनात एकनाथ शिंदे संतापलेले दिसले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची तुलना थेट औरंगजेबाशी केली होती. त्यावरुन शिंदेंचा संताप दिसून आला. खरंतर काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे. मात्र काँग्रेसच्या टिकेवरुन अधिवेशनात एकनाथ शिंदे फडणवीसांच्या मदतीला धावून आलेत. आक्रमक होत सपकाळांवर घणाघात केला. शिंदेंचा एवढा संताप होण्यामागे सपकाळ यांनी काय विधान केलं होतं ते पाहूया.

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण सुरु झालंय. शिवसेनेनं त्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. ही कबर महाराष्ट्राला लागलेलं कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे, अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. एकीकडे महायुतीत सारं काही आलबेल नाही. त्यातही शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे. शिंदेच्या कार्यकाळातील अनेक प्रकल्प फडणवीसांनी रद्द केलेत. याशिवाय अर्थसंकल्पात शिवसेनेच्या वाट्याला निधी कमी आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीसांसाठी धावून आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. कबरीचा वाद कोणत्या वळणावर जाणार? या संवेदनशील मुद्यावरुन महायुतीतल्या तीन्ही पक्षांमध्ये एकी दिसणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT