Harishchandragad News Saam Tv
महाराष्ट्र

Harishchandragad News: ट्रेकिंग जीवावर बेतलं! हरिश्चंद्र गडावर वाट चुकले; रात्रभर थंडीत कुडकुडून तरुणाचा मृत्यू

Priya More

सचिन बनसोडे, अहमदनगर

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडावर (Harishchandragad) ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळू नाथाराम गिते असं या मृत पर्यटकाचे नाव आहे. रस्ता भरकटल्यामुळे बाळूसोबत त्याचे मित्र हरिश्चंद्रगडावर अडकले होते. रात्रभर सतत पडणारा पाऊस आणि थंडीमुळे कुडकुडून या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्र्यय आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सहा तरुण पुण्यावरुन हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी आले होते. हे सहाही तरुण पुण्यातील कोहगाव येथे राहणारे आहेत. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता या तरुणांनी तोलार खिंडीतून गडावर चढण्यास सुरुवात केली.

गडावर चढत असताना धुक्यामुळे ते हरिश्चंद्रगडाच्या जंगलात रस्ता भरकटले. पाऊस सुरू झाल्याने या सहा जणांनी डोंगर कपारीचा आसरा घेत मुक्काम केला. पाऊस आणि थंडीने रात्रभर काकडल्याने या तरुणांची प्रकृती खराब झाली. यामधील अनिल उर्फ बाळू गिते या तरुणाची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्याचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.

वन विभागाला याबाबत माहिती समजताच स्थानिक गावकरी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने मयत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून केले रेस्क्यू. तीन तरुणांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या तरुणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT