Hanuman Chalisa Case Saam Digital
महाराष्ट्र

Hanuman Chalisa Case : हनुमान चालिसा प्रकरण; राणा दाम्पत्याला ९ मे रोजी हजर राहण्याचे न्यायालयाचे निर्देश

Hanuman Chalisa Case : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठन करण्याचा अट्टहास करणाऱ्या राणा दाम्पत्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोप निश्चिती प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Sandeep Gawade

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठन करण्याचा अट्टहास करणाऱ्या राणा दाम्पत्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोप निश्चिती प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज न्यायालयात सुनावणीवेळी अनुपस्थित राहिल्याने राणा दाम्पत्याला ९ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी एप्रिल २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठणचा प्रयत्न करून सामाजिक वातावरण कलुषित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात दोघांनी दोषमुक्ततेसाठी अर्ज केला मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळला.

आरोप निश्चितीवर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून आज न्या. राहुल रोकडे यांच्या समोर सुनावणी होती अमरावतीत आज (ता.२६) मतदान असल्याने राणा दाम्पत्याने न्यायालयात हजेरीपासून सूट द्यावी असा अर्ज ऍड. शब्बीर शोरा यांच्यामार्फत केला. मतदानाचे कारण विचारात घेत न्यायालयाने दाम्पत्याला एक दिवस गैरहजर राहण्याची मुभा दिली. व ९ मेच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT