Solapur: आबा कांबळे खून प्रकरणी गामा पैलवानासह ७ जणांना जन्मठेप
Aba Kamble Case Solapur Saam Tv

Solapur: आबा कांबळे खून प्रकरणी गामा पैलवानासह ७ जणांना जन्मठेप

Aba Kamble Case: सोलापूरमधील आबा कांबळे हत्या प्रकरणाचा निकाल आज लागला असून या प्रकरणातील ७ आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलीय. ऋतुराज शिंदे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कांबळे यांची हत्या करण्यात आली होती.
Published on

विश्वभूषण लिमये, सोलापूर

Aba Kamble case Solapur District Session Court verdict: सोलापूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या आबा कांबळे खून प्रकरणाचा निकाल आज लागला. या खून प्रकारणात ७ जणांना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. कोर्टाने तब्बल सहा वर्षांनी या खून प्रकरण निकाल दिलाय.

गामा पैलवान उर्फ सुरेश शिंदे, तौसिफ विजापूरे, प्रशांत शिंदे, रविराज शिंदे, गणेश शिंदे, निलेश शिंदे, नितीन खानोरे अस शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. आबा कांबळे खून प्रकरणात ८ कोयत्यांचा वापर करण्यात आला होता.

आबा कांबळे याची सोलापुरातील मोबाईल गल्लीत ५६ वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ऋतुराज शिंदे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कांबळे यांची हत्या करण्यात आली होती. दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह २८ साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. आबा कांबळे यांची हत्या २०१८ साली झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com