Kunal Kamra Saam
महाराष्ट्र

Kunal Kamra: कामराच्या गाण्यावरून तोडफोड, 'हॅबिटॅट' क्लबनं घेतला मोठा निर्णय; क्लब कायमचा बंद होणार?

Shiv Sena Protest Against Kunal Kamra: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या शोदरम्यान सादर झालेल्या विडंबनात्मक गाण्यावरून शिवसैनिकांनी हॅबिटॅट क्लब स्टुडिओत तोडफोड केली. नुकसान झाल्यानंतर स्टुडिओ तात्पुरते बंद राहणार आहे.

Bhagyashree Kamble

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्यच्या माध्यमातून खिल्ली उडवली. गाण्यात 'गद्दार' हा शब्द वापरल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कुणाल कामराचा शो झालेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली. तेथील वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या प्रकरणी ४० जणांवर कारवाई करण्यात आली, तसेच ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या प्रकरणानंतर आता कुणालचा स्टुडिओ बंद राहणार आहे. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत स्टुडिओ बंद राहिल, अशी पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी शेअर केली आहे.

कुणालचा द हॅबिटॅट क्लब स्टुडिओमध्ये कार्यक्रम होता. त्याने यात एक गाणं सादर केलं. या गाण्यात त्यानं शिवसेना पक्षफुटीवर तिरकस शब्दात भाष्य केलं होतं. मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेता टीका केली. यावरून शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत कुणालच्या स्टुडिओवर हल्ला चढवला. बऱ्याच वस्तूंचं नुकसान केलं. त्यामुळे आता द हॅबिटॅट क्लबने तेथील कार्यक्रम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय?

खारमधील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली. ज्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये, 'तोडफोडीच्या कृत्यांमुळे आम्हाला धक्काच बसला आहे. याचे आम्हाला दु:ख आहे. कोणत्याही कलाकाराने सादर केलेल्या कंटेंटमध्ये आम्ही कधीही सहभागी झालेलो नाही. ते त्यांच्या मतांसाठी जबाबदार आहेत. बऱ्याचदा एखादा कलाकार मर्यादा ओलांडतो, तेव्हा आम्हाला लक्ष्य केलं जातं, दोषी ठरवलं जातं'.

स्टुडिओनं पुढे म्हटलं की, 'जोपर्यंत आम्हाला कोणताही धोका नसलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेला प्लॅटफॉर्म प्रदान करण्याचा एक चांगला मार्ग सापडत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा प्लॅटफॉर्म बंद करत आहोत', असं हॅबिटॅट क्लबच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

'हॅबिटॅट हे नेहमी सर्व प्रकारच्या कलाकारांसाठी, त्यांचे काम शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ बनले होते. ज्याला आपली कला सादर करायची आहे. त्यांच्यासाठी आमचा दरवाजा कायम खुले आहेत. लोक यातून एक्सप्लोर करू शकतात. पण सध्या हे क्लब बंद राहिल'. असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT