H3N2 Virus In Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

H3N2 Virus : राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; आरोग्यमंत्र्यांनीही दिले संकेत

H3N2 Virus In Maharashtra : संपूर्ण राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

H3N2 Virus In Maharashtra : संपूर्ण राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे. H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

कोरोनानंतर (Corna Virus) देशावर आता नव्या विषाणूचं संकट आलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्येही या विषाणूने डोकं वर काढलं आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर महत्वाच्या शहरांमध्ये H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत.

मार्च महिन्यातील 15 दिवसांत मुंबईमध्ये H3N2 विषाणूच्या 53 रुग्णांची नोंद झाली आहे. तर जानेवारी ते मार्च या 75 दिवसात H3N2 चे 118 रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे बुधवारी राज्यात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण अहमदनगर आणि एक रुग्ण नागपूर येथील आहे. (Maharashtra Breaking News)

इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या 'H3N2' या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे 19 ते 60 वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. यावरून या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसची लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे. त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत काय म्हणाले?

दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या पार्श्वभूमीवर महत्वाचं आवाहन केलं आहे. H3N2 मृत्यू होत नाही. तो रूग्ण 2 दिवसांत बरा होता. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी असे संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार केले जातील. आजार अंगावर काढू नका. खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, अंतर पाळा तसेच मास्क वापरा, असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे.

दुसरीकडे, राज्यातील सर्व खाजगी प्रॅक्टिशनर्सना मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली गेली आहे. जर 24 तासांच्या आत ताप कमी झाला नाही तर चाचण्यांच्या निकालांची वाट न पाहता Oseltamivir हे औषध ताबडतोब सुरू केले जावे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT