Gunratna Sadavarte on Raj Thackeray Morcha  Saam Tv News
महाराष्ट्र

Gunratna Sadavarte : 'राज-उद्धव ठाकरेंचा मोर्चा निघूच देणार नाही'; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा, हिंदी भाषेवरुनही तोडले अकलेचे तारे

Gunratna Sadavarte on Raj Thackeray Morcha : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देत नाही', असं म्हणत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केल्यापासूनच सदावर्तेंनी मोर्चाला विरोध दर्शवला होता.

Prashant Patil

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून ते चौथीपर्यंत त्रिभाषा सुत्रीचा वापर हिंदी सक्तीला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यापासून विरोध केला आहे. मात्र, शासनाने तरीही हा निर्णय मागे घेतला नसून निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मनसेसह विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील मराठीच्या मुद्यावर एकत्र येत मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी 'मराठीसाठी एकत्र या', असा नारा देत सर्वपक्षीयांना आवाहन केलं आहे. त्यास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने साद देत मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देत नाही', असं म्हणत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केल्यापासूनच सदावर्तेंनी मोर्चाला विरोध दर्शवला होता.

'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा मी निघू देणार नाही', अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर भाषेचा दाखला देत मोर्चा निघू देणार नसल्याचं म्हटलं आहे. 'जे नियम सर्वसामान्यांना आहेत, तेच नियम यांनाही लागू असले पाहिजे. मुख्यमंत्री ⁠देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटतात, यावर मला बोलायचं नाही. पण, ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे बाळगोपाळाचा मोर्चा आहे, ⁠हिंदी रोखणं म्हणजे मुलांचं शिक्षणासोबत खेळण्यासारखं आहे', असंही सदावर्तेंनी यावेळी म्हटलं. 'राज ठाकरे भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या नावावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज ठाकरेंना मोर्चासाठी परवानगी नसून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे', अशी भूमिका सदावर्ते यांनी घेतली आहे. त्यावरुन, मनसेनेही संताप व्यक्त करत सदावर्तेंना थेट मारहाण करण्याचा इशारा दिला आहे.

'ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे बाळगोपाळाचा मोर्चा आहे, ⁠हिंदी रोखणं म्हणजे मुलांचं शिक्षण खेळण्यासारखं आहे'
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. यावर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, 'मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांना आहे. या राज्यात मराठी सक्तीची आहे. भाजप मराठीसाठी कट्टर आहे. मराठीसाठी आग्रही आहे. भाजप आणि केंद्र सरकारमुळेच मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे. ते लोक किंवा अजून कोणी गैरसमजाचे बळी आहेत. गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरू नयेत, जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावे', असं शेलार म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

SCROLL FOR NEXT