Sharad pawar And Gunratna sadavarte saam tv
महाराष्ट्र

Gunratna Sadavarte on Sharad Pawar: शरद पवार हे वैचारिक व्हायरस; गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर टीका

Sharad Pawar News Today: गुणरत्न सदावर्ते यांनी पून्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

विजय पाटील

Sangli News: एसटी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी आंदोलन पुकारले होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला होता. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून राज्यात जोरदार वादंग माजला होता. त्यानंतर आज गुणरत्न सदावर्ते यांनी पून्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार (Sharad Pawar) वैचारिक व्हायरस आहेत. ते वैचारिक व्हायरस निर्जंतुकीकरण करणार. या व्हायरसचा स्प्रेड होऊ नये म्हणून आम्ही वैचारिक गोष्ट देण्यासाठीची ही आमची सभा वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात करत आहोत. तसेच अजित पवार (Ajit Pawar) म्हणायचे एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरन होणार मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा सरकारच्या एकाही मंत्र्यांकडून वर्षभरात अशी वक्तव्ये झाली नाहीत.

त्यामुळे येत्या अधिवेशनात विलिनीकरण निर्णयाची वाट बघा अशा शब्दात एसटी कष्टकरी जनसंघाचे मार्गदर्शक गुणरत्न सदावर्ते यांनी विलिनीकरणाबाबत टीका केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा लढा आम्ही लढत आहोत. शरद पवारांनी एस्टी कर्मचाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण केली असा आरोपही सदावर्ते यांनी यावेळी केला. ते सांगलीत बोलत होते.

"हे बदला बदलीचा राजकारण फक्त शरद पवारांच्या डोक्यात असते. पण त्यांनी भाकरीचा अपमान केलेला आहे. त्यांना जे म्हणतात ना स्वार्थ जागा झाला म्हणून अजित पवारांची झोप उडाली आहे. राजकारणासाठी भाकर वापरायची नसते ती या भूमातेतून आलेली आहे", असे देखील ते म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT