Gudi Padwa 2023, kolhapur, school admission, parents, students saam tv
महाराष्ट्र

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शाळा प्रवेश, रात्रीपासून पालकांची भली माेठी रांग

आज पाडव्या निमित्त अनेक ठिकाणी शाळा प्रवेश केला जाताे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजित माजगावकर

Kolhapur : गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2023) शुभ मुहूर्तावर आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालक गुढीपाडव्याच्या दिवशी विविध शाळांमध्ये जाऊन मुलांचा प्रवेश नाेंदवितात अथवा घेतात. कोल्हापुरातील एका शाळेत काल रात्रीपासूनच मुलांचा प्रवेश निश्चित व्हावा यासाठी पालकांची मोठी रांग लागली हाेती.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर येथे आज सकाळी काही पालक मुलांच्या ऍडमिशनसाठी आले असता त्यांना अन्य पालकांची मोठी रांग दिसली. हे पाहून पालकांना धक्काच बसला. त्यांनी चाैकशी केली असता रात्रीपासूनच पालकांनी शाळा परिसरात ठिय्या मांडल्याचे समजले.

खरंतर जरग नगर शाळा ही महापालिकेची कोल्हापुरातील सर्वोत्कृष्ट शाळा आहे. याचं शाळेतील अनेक मुले राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रक्रमाने येतात. त्यामुळेच या शाळेत ऍडमिशन मिळावं यासाठी अनेक पालक सुरुवातीपासून प्रयत्न करत असतात.

आज गुढीपाडवा असल्याने शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे रात्रीपासून पालकांनी शाळेच्या परिसरात प्रवेश अर्ज मिळावा यासाठी गर्दी केली हाेती. दरम्यान सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पालकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT