Deepak Kesarkar, Kolhapur Rain  Saam
महाराष्ट्र

Kolhapur Rain : फुलेवाडी गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरू, शाळांच्या सुट्ट्यांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती (पाहा व्हिडिओ)

Deepak Kesarkar News : ज्या विद्यार्थींची परीक्षा बुडालेली आहे त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपल्ब्ध केली जाईल असेही केसरकरांनी नमूद केले

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Rain News : कोल्हापुरातील पूर परिस्थिती कमी झाली आहे. पावसामुळे जे मार्ग बंद करण्यात आलेले हाेते. ते मार्ग पुन्हा सूरु करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. पुलांवरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज (गुरुवार) काेल्हापुरात माध्यमांशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षेच्या संदर्भातील आढावा बैठक आज पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत केसरकर यांनी आपत्कालीन यंत्रणांचा आढावा घेतला. अद्याप ज्यांचे स्थलांतर झालेले नाही अशा नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना केसरकर यांनी दिल्या.

माध्यमांशी बाेलताना पालकमंत्री केसरकर म्हणाले पूर परिस्थितीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी हाेऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले हाेते. आरोग्य व पशुसंवर्धन विभागाने युध्दपातळीवर काम करुन लोकांची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

उद्यापासून काेल्हापूरातील (kolhapur) ज्या शाळा बंद म्हणजे सुट्टी देण्यात आल्या हाेत्या. त्या शाळा सुरु केल्या जातील. ज्या नागरिकांना स्थलांतरित केले आहे. उद्या सकाळी स्थलांतरित लोक घरी जातील. आज त्यांना पाठविले आणि पाणी वाढले तर धाेका निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंतची आपण वाट पाहत आहाेत असेही केसरकर यांनी नमूद केले.

दरम्यान पावसामुळे ज्या विद्यार्थी (students) यांचं नुकसान झाले आहे. ज्यांची परीक्षा बुडालेली आहे त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपल्ब्ध केली जाईल असेही केसरकरांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT