Yavatmal Crime News Saam tv
महाराष्ट्र

नवरदेवाने पन्नास लाखांसाठी लग्न मोडले; फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - लग्नासाठी मुला-मुलीने एकमेकांना पसंद केले. त्यानंतर लग्नाचा मुहूर्त ठरला. आवडीचे कपडे आणि दागिन्यांची खरेदी झाली. जेवणाचा मेन्यूही निश्चित झाला. बोलणीपेक्षा अधिक खर्च होत असला तरी मुलीच्या वडिलांनी हौसेखातर त्याकडे कानाडोळा केला. उत्साहाने लग्नाच्या पत्रिका वाटल्या. मात्र, ऐन लग्नाच्या चार दिवसा आधी मुलाने पुण्यात (Pune) फ्लॅट घेण्यासाठी ५० लाखांची मागणी केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात राहणाऱ्या सुस्वरूप कमावत्या मुलीचा मोठ्या उत्साहात रूपेश नाईक याच्याशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. देण्याघेण्याची बोलणी झाली. त्यात मुलाला पन्नास हजारांचे कपडे व तीस ग्राम सोने मुलीच्या पित्याने देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे अमरावती येथे मुलाने पन्नास ऐवजी ८५ हजारांचे कपडे खरेदी केले.सोन्याचे दागिनेही तीस ग्रॅमवरून ३८ ग्रॅम घेतले. याचे रोख पैसे मुलीच्या वडिलांनी तत्काळ दिले.

या दोन्ही खरेदीच्या पावत्या मुलाने स्वतःच्या नावे बनवून जवळच ठेवल्या. हा डाव वधूपित्याच्या लक्षात आला नाही. त्यांनी पत्रिका छापून नातेवाईकात वितरित केल्या.यवतमाळातील शोभिवंत अशा मंगल कार्यालयात विवाह सोहळा निश्चित केला. दि.११ जून रोजी हा विवाह होणार होता. मात्र त्यापूर्वी मुलाने पन्नास लाखांची मागणी करित विवाह मोडला. लग्नाच्या चार दिवसा आधी मुलाने पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी करत विवाह करण्यास नकार दिला. यात वधूपित्याला तब्बल ३ लाख ८६ हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी अवधूतवाडी पोलीसात फसवणूक आणि हुंडा प्रतिबंधक अधिनियम नुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

Gk: हाताच्या तळव्यावर केस का नसतात? कारण वाचून चकित व्हाल

Online Shopping Scam : ऑनलाइन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यासोबत होईल हा स्कॅम

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

Paracetamol safety: गरोदर महिलांसाठी पॅरासिटोमोल किती सुरक्षित? WHO आणि AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT