Manikrao Kakate Saam Tv
महाराष्ट्र

Manikrao Kakate: कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले; पाहा VIDEO

Manikrao Kakate Video: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी त्यांच्या कृषीमंत्रिपदाबाबतच हे विधान केले. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.

Priya More

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकताच शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. 'हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?', असं वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. हे वक्तव्य ताजं असतानाच माणिकराव कोकाके पुन्हा बरळले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. स्वत:च्या मंत्रिपदाबाबत त्यांनी हे विधान केलं. 'कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी', असं ते म्हणाले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभजी नगर शहरात प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना माणिकराव कोकाटे यांनी स्वत:च्या मंत्रिपदाबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले की, 'कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिलं.', माणिकराव कोकाटे यांनी कृषी खात्याची महती गाताना ओसाड गावच्या पाटीलकीचा उल्लेख केला. या वक्तव्याच्या माध्यमातून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी खात्याबाबतच नाराजी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

दरम्यान, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिकला मोठा फटका बसला. नाशिकमध्ये कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याठिकाणचा बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?', हे वादग्रस्त विधान केले. कृषीमंत्र्यांचे हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे ठरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

SCROLL FOR NEXT