Police investigate the crime scene after a granddaughter allegedly murdered her 82-year-old grandmother in Solapur. saam tv
महाराष्ट्र

रक्ताच्या नात्याला काळिमा! नातीने दगडावर आपटून आजीला निर्घृणपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Granddaughter Kills Grandmother In Solapur Over Family Dispute: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातीनेच ८२ वर्षीय आजीचा दगडावर डोके आपटून खून केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

सोलापूर: आजी सतत किरकिर करते या रागातून नातीने ८२ वर्षीय वृद्ध आजीचे दगडावर डोके आपटून आणि हातपाय मोडून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना करमाळा तालुक्यातील विहाळ येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नातीला अटक केली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जनाबाई भगवान सुरवसे (वय ८२, रा. विहाळ) असे मृत आजीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४२ वर्षीय मनीषा रवींद्र लवंगारे या नातीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जनाबाई सुरवसे या गेल्या काही काळापासून पक्षाघाताने (पॅरालिसिस) आजारी होत्या. आजारपणामुळे त्या एकाच जागी बसून असायच्या. आरोपी मनीषा लवंगारे ही आपल्या माहेरी विहाळ येथे आली होती. आजी आजारपणामुळे सतत किरकिर करते, याचा मनीषाला राग येत होता.

मध्यरात्रीच्या सुमारास याच रागातून मनीषाने आजीवर हल्ला केला. तिने आजीचे हातपाय मोडून काढले आणि दगडावर डोके आपटून त्यांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात आरोपी मनीषा लवंगारे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. एका नातीनेच आपल्या रक्ताच्या नात्यातील वृद्ध आजीचा अशा प्रकारे अंत केल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अडचणीत मित्र साथ देतील, महालक्ष्मींची कृपा राहील; ५ राशींच्या लोकांना अफाट धनसंपत्ती अन् प्रेम मिळणार

मराठीत 94 हजार विद्यार्थी नापास, मातृभाषेतच 8 टक्के मुलांची दांडी गुल

मी स्वत: वकील...; भाजपच्या विरोधात लढाई सुरू, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

2 माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा, भ्रष्टाचाराविरोधात भारतात कडक कायदे कधी?

सुप्रिया सुळेंनी अपघात झाल्यानंतर ठेवलं स्टेटस अन् प्रवाशांना दिला महत्वाचा संदेश

SCROLL FOR NEXT