bribe news, akola news, Akola Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

सरपंच पतीने मागितली सव्वा लाखाची लाच; दाेघे अटकेत

पाेलीसांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना अटक केली आहे.

जयेश गावंडे

अकोला : पाझर तलावाच्या कामावर बांधकाम साहित्य पुरवठा केल्याचे धनादेश काढण्यासाठी तब्बल एक लाख 27 हजाराची मागणी करणाऱ्या ग्रामसचिव आणि सरपंच (sarpanch) यांच्या पतीस एसीबीने (acb) अटक (arrest) केली. (akola latest marathi news)

अकोल्यातील (akola) पातूर तालुक्यातल्या राहेर अडगाव या गावात ही घटना घडली आहे. राहेर अडगाव या गावांतर्गत येणाऱ्या पिंपलखुटा परिसरात पाझर तलाव येथील बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता. दरम्यान या कामाचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेवक राजेंद्र मेहेरे आणि सरपंच पती अशोक बोराडे या दोघांनी तक्रारदाराला एक लाख 27 हजरांची लाच मागितली होती.

पातूर येथील एका रसवंतीवर लाच देण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान संशयित आराेपींना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम घटनास्थळी स्वीकारली नाही. पाेलीसांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: सिगारेट न दिल्यामुळे तरूणाला राग अनावर, दुकानदाराची गोळ्या घालून हत्या

Pune Crime : १० लाख दे नाहीतर गोळी खाण्याची ताकद ठेव! घायवळ टोळीचा "प्रतिस्पर्धी" संतोष धुमाळ वर मकोका दाखल

Blast In Military Plant: लष्कराच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, १९ जण जिवंत जळाले; बचावकार्य सुरू

Avika Gor: लग्नात प्रसिद्ध अभिनेत्रीचं हरवलं मंगळसूत्र; भर मंडपात लागली रडू, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना आवरा - जैन मुनी

SCROLL FOR NEXT